आपण विज्ञानाची ‘सृष्टी’ घेतली, पण विज्ञानाची ‘दृष्टी’ घेतली नाही! विज्ञानाची ‘करणी’ घेतली, पण विज्ञानाची ‘विचारसरणी’ घेतली नाही!
माझ्या आयुष्यात जे-जे काही घडतं, त्या प्रत्येक कार्याच्या मागे कारण आहे. ते कारण मला शोधता येतं, आणि मला शोधता येतं म्हणून ते मला बदलता येतं. त्यामुळे ज्या वेळी तुम्ही ‘वैज्ञानिक दृष्टीकोन’ विसरता, त्या वेळी तुम्ही स्वतःच्या जीवनाची सूत्रं दुसऱ्यांच्या हातामध्ये देता. तुम्ही ज्या वेळी ‘वैज्ञानिक दृष्टीकोन’ स्वीकारता, त्या वेळी तुम्ही स्वतःच्या जीवनाची सूत्रं स्वतःच्या हातात घेता!.......